
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- राज्यातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रितपणे काम व संघटन करणे कामी विविध माध्यमातून प्रयत्न केला जातोय असे मात्र एक कि लातूरात
महाराष्ट्र तंत्र शिक्षण कर्मचारी संघटनेच्या एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर शाखेची वार्षिक बैठक या महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे सर, कोषाध्यक्ष प्रा. संतोष बेंबळकर, सचिव प्रा. नागराज कांबळे यांच्यासह एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. ज्योती हत्ते, उपप्राचार्य प्रा. विरभद्र बाळे व इतर अनेक मान्यवर शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संघटनेचे प्रा. एन. जी. धाराशिवे यांनी आपल्या प्रस्तावनेत संघटनेने आजवर केलेल्या कर्मचारी हिताच्या कार्याचा आढावा घेतला. कोरोना काळात बऱ्याच अभियांत्रिकी महाविद्यालयच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा पगार कपात केली होती, पण या संघटनेच्या एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंती आणि आग्रहाला मान देऊन इथल्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा पगार कपात न करता या संकट काळी अगदी वेळेवर पगार करून कर्मचाऱ्यांना जो आधार दिला होता त्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष प्रा. कसबे यांनी कॉलेजच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. पण त्याचबरोबर या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात फार उशीर झाला असून तो तात्काळ लागू करून व्यवस्थापनाने आपली सामाजिक प्रतिष्ठा द्विगुणीत करून घ्यावी असे आव्हान करण्यासही प्रा. कसबे विसरले नाहीत. एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील या संघटनेच्या शाखेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपत आल्याकारणाने उपस्थित सर्व सभासदांच्या सहमतीने ती बरखास्त करून नवीन कार्यकारणी या बैठकीत प्रा. कसबे यांच्याकडून जाहीर करण्यात आली. त्यात प्रामुख्याने प्रा. सौ. भाग्यश्री कोळखेरे, प्रा. अविनाश पेददे, प्रा. एन जी धाराशिवे, प्रा. पठाण, प्रा. ओमकार पाटील, प्रा. सौ. स्वाती शेटकार, श्री. मंगेश गायकवाड, श्री. सोमनाथ देशमुख, श्री. खोबरे श्री. वीरभद्र झुंजारे इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांच्या सह्यानिशी दोन निवेदने प्राचार्याकडे सादर करण्यात आले. तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करणे आणि महाविद्यालयातील एल एम सी बैठकीसाठी दोन कर्मचारी प्रतिनिधी स्वीकारण्यात यावेत यासाठीचे हे दोन निवेदने होते. या बैठकीसाठी महाविद्यालयातील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मंगेश गायकवाड
सचिव
(महाराष्ट्र तंत्र शिक्षण कर्मचारी संघटना)
शाखा: एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर