
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रा कमिटीला आव्हान करण्यात आले होते की यात्रेतील अनावश्यक खर्च टाळून गावच्या सुरक्षिततेसाठी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसा प्रस्ताव गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश करपे यांनी यात्रा नियोजनाच्या मीटिंगमध्ये यात्रा कमिटी समोर मांडला होता.यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री सुनील तात्या वडघुले व ग्रामस्थांनी या चांगल्या उपक्रमास साथ देत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता दिली.आजच्या या युगात गावातील यात्रा महोत्सवावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण टाकळी भिमा ग्रामस्थांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आपल्या गावच्या सुरक्षेविषयी जागरूक राहात समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
टाकळी भिमा येथे श्रीराम मंदिर परिसरामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयासमोर,पोलीस पाटील कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफिस, स्मशानभूमी मज्जिद, मतदान केंद्र व गावच्या मेन चौकामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी 17 कॅमेरे बसून एक आदर्श घालून दिलेला आहे. डीवायएसपी प्रशांत ढोले साहेब व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीआय श्री दीप रतन गायकवाड यांनी श्रीराम यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.