
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
जालना : जिल्ह्यातील धनगर पिंपरी या गावात सीईओंची प्राथमिक आरोग्य केंद्रांना सरप्राईज भेट:कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना
धनगर पिंपरी या गावाची
कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना
अंबड तालुक्यातील व धनगर पिंपरी आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मणियार यांनी मंगळवारी ता. ८ दुपारी ४ वाजेच्या सुमारे सरप्राईज भेट दिली. यावेळी त्यांनी कामकाजाची पाहणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत.
जालना जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार यांनी सरप्राईज व्हिजीट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. खुद्द मुख्यकार्यकारी अधिकारी आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावाधाव झाली.
यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते, किती रुग्णांना रेफर केले जाते, रेफर केल्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली. या शिवाय काही रुग्णांशी संवादही साधला. त्यानंतर त्यांनी थेट धनगर पिंपरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तालुका अधिकारी टी एच ओ डॉ अनिल वाघमारे यांनी धनगर पिंपरी प्राथमिक केंद्राची माहिती दिली मात्र अधिक चौकशी नंतर ते आरोग्य सेवेच्या कामासाठी बाहेर होते तर दुसरे वैद्यकिय अधिकारी हजर असल्याचे दिसून आले. या ठिकाणीही त्यांनी कामकाजाची पाहणी केली.दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या, विनाकारण रुग्णांना रेफर करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत. तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणुक द्यावी. एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जालन्याचे सी ई ओ मणियार साहेब यांनी दिली यावेळी दिल्या.मा मुख्यकार्यकारी अधिकारी मनियार सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धनगर पिंपरी येथे अचानक भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, एक्सपायरी औषधी, इंजेक्शन रूम, डिलिवरी रुम, आणि ऑपरेशन थेएटरमध्ये जाऊन पाहणी केली व सर्व कर्मचारी यांना काही सुचना दिले.त्या वेळी या अंबड तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ अनिल वाघमारे सर व एच ओ ऑफिसचे चाळक सर. औषध निर्माण अधिकारी सुपरवाझर. गव्हाणे साहेब.एच व्ही वाडे .सिस्टर पीएचसी ए एन एम कातकडे .सिस्टर सबसेंटर ए एन एम गटप्रवर्तक खांडेकर .मॅडम लॅबटक्निशियन जावळे सर. रुग्णवाहिका चालक डी बी बहुले व ग्रामसेवक ढवळे साहेब कृष्णा पवार .ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव. व गावातील नागरिक संतोष मोढेकर. सुशील खांडेकर. ज्ञानेश्वर साळुंके. ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी नरोडे. संतोष कचरे .व इतर कर्मचारी उपस्थित होते