
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड प्रतिनीधी -अशोकराव उपाध्ये
प्रधानमंत्री; लोकसभा अध्यक्ष सहीत काही राज्यपाल तथा मुख्यमंत्र्यांनी प्रगट केल्या शोक संवेदना . चार वर्षा पूर्वी बनल्या होत्या माऊंट अबूच्या मुख्य प्रशासिका .
ब्रम्हा कुमारीज आबू रोड राजस्थानच्या प्रमुख १०१ वर्षीय राज योगीनी दादी रतन मोहीनी अमदाबाद येथील जाइडिस अस्पताल येथे ८ एप्रील रोजी त्यांचे देहावसन झाले असून १०एप्रील रोजी त्यांचे पार्थिवावर माऊंट अबू येथे अन्त्य संस्कार पार पडणार आहे . दादीजीचे निधनावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्रमोदी शोक संवेदना प्रकट करताना म्हणाले की दादी अध्यात्मीक उर्जाने परीपूर्ण होती . त्यांच्यात सदैव प्रकाश ज्ञान व करुणाचे रुपाने त्यांचीआठवण केली जाईल . साधेपणा: विनम्रता धैर्य विचाराची स्पष्टता दयाळूपणा सेवाप्रती प्रतीबद्यता त्यांच्यात पहायला मिळाली . दुखाच्या घडीला मी ब्रम्हा कुमारीज सोबत असल्याचे त्यानी म्हटले . लोकसभा अध्यक्ष ओम बीरला; राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे; मुख्य मंत्री भजनलाल शर्मा; राज्यपाल रमन डेका; सीएम विष्णू देव साय; माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हान इत्यादीनी शोक प्रगट करीत त्यांना श्रद्धांजली वाहली . अमरावती ब्रम्हा कुमारीज केंद्राच्या मुख्य प्रशासीका राजयोगी सिता दिदि कारंजा लाड ब्रम्हा कुजारीज
केंद्राच्या प्रमुख राजयोगी मालती दिदि यांनी सुद्धा शोक प्रगट करीत त्यांना श्रद्धांजली अर्पन केली .