
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
हिंगोली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सोमवारी तब्बल १० हजार क्विंटल हळदीची आवक झाली. परंतु, हळदीचे दर तब्बल १ हजाराने गडगडले. परिणामी हळद विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसल्याचे दिसून आले. सोमवारी आलेल्या हळदीचे मोजमाप दोन दिवसांत होणार असल्याने शेतकऱ्यांना मोंढ्यात मुक्काम करावा लागणार आहे.
गत आठवड्यात हळदीला कमीत कमी १३ तर जास्तीत जास्त १६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. परंतु, सोमवारी हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. रविवारी सोमवारी मंगळवारी सकाळपासूनच हळद घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३०० वाहनांचा यामध्ये समावेश होता. सोमवारी ११ वाजता हळदीच्या
लिलावाला सुरुवात झाली. हळदीला १२ हजार ५०० ते १४ हजार ५०० पर्यंत दर मिळाला. सरासरी १३ हजार रुपये दर
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सोमवारी १० हजार क्विंटल आवक झाली. लिलावासाठी ओट्यावर हळदीची ढिगारे टाकण्यात आली होती.
मिळाल्याचे दिसून आले. यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही घट ३० टक्क्यांपर्यंत असल्याने
यंदा लागवड क्षेत्र वाढणार
गतवर्षी हळदीला मिळालेल्या
समाधानकारक दरामुळे चालू हंगामात हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. परंतु अतिवृष्टी व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट झाली. परंतु, काही प्रमाणात हळदीला तेजी असल्याने पुढल्या वर्षीही हळदीला चांगले दर राहतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पुढील हंगामाच्या हळद लागवडीसाठी बेणे खरेदी केले आहे. त्यामुळे यंदा जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होईल असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे..
हळदीचे दर तेजीत राहतील असे बोलले जात असताना सोमवारी १ हजार रुपयाने दर गडगडल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या
चिंता वाढल्या आहेत. हळदीला किमान १६ ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सध्यातरी हळदीला १३ ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळत आहे.
ज्ञानेश्वर नागरे
हळद उत्पादक शेतकरी कुऱ्हा