
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य ग्रामीण भागातील मौजे तिर्थ ता अहमदपूर जिल्हा लातूर या परिसरातील कार्यरत असणाऱ्या शाळा व शाळेतील विविध उपक्रम व योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दिसून येत आहेत का व राबविले जातात का याची
पडताळणी करणेकामी तालुका गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांनी शालेय वेळेत दिलं भेट व मुलांचे बौद्धिक व शैक्षणिक तसेच शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत कि नाही हे पडताळून पाहण्यासाठी प्रत्यक्ष मुलांसमवेत चर्चा केली आहे.तर . यावेळी अध्ययन स्तर निश्चिती भरलेले प्रपत्र , कृती आराखडे, अध्ययन स्तर निश्चिती पडताळणीसाठीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या . संकलित मूल्यमापन 2 / PAT3 वर्ग पाचवी विषय- इंग्रजीचा पेपर चालू होता .100 % विदयार्थी उपस्थित होते .आदरणीय ढोकाडे साहेबांनी वर्गाची अध्ययन स्तर निश्चिती पडताळणी केली आहे तर दुसरीकडे शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या बाबतीत उपस्थित शिक्षक व मु अ. याना उन्हामुळे मुलांनाबाबत घेवायच दक्षता या बाबतीत सविस्तर माहिती व मार्गदर्शनपर चर्चा केली आहे,
दरम्यान वेळी प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने कार्यालयाकडून येत असल्या पत्रव्यवहार व त्यांची अंमलबजावणी आपल्या स्तरावर कशाप्रकारे करावी याबद्दल सविस्तर असं स्थानिक मुख्याध्यापक व सहशिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले व या शैक्षणिक वर्षात होत असलेल्या कार्यास सदिच्छा देण्यात आल्या तर एका बाजूला इयत्ता पहिली व दुसरी शाळेतील मुलांचे गुणवत्ता शैक्षणिक प्रगती पाहता संबंधित वर्गशिक्षक यांना उत्कृष्ट कार्य करीत असल्याबाबत त्यांचे सुती सुमन करत त्यांना शुभेच्छा दिल्या व असेच आपले कार्य अविरतपणे चालू ठेवावे अशी शुभेच्छा दिल्या.
यादरम्यान वेळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक वृंद सर्व उपस्थित होते तर सर्व शिक्षक आपले कार्य प्रभावी पार पाडत होते..