
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
पैठण: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ ( विज्ञान) महाविद्यालयात आज भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील तर प्रमुख पाहुणेपदी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.हरी कोकरे, एनसीसी विभागप्रमुख अरुण मुंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निर्मलसिंग निकुंभ, सदाशिव कराजंगी, समित देशमुख, वसंत केंद्रे, राहुल चव्हाण, मोहन अहिरे, दादासाहेब काशीद, शेखर भिंगारे, लक्ष्मण धोत्रे, विशाल रगडे, अमोल गिरी, अनिल जगताप, दत्तात्रय लोखंडे, विजय पाटील, रामकृष्ण काळे, अभय नंदन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.