
दैनिक चालु वार्ता केज प्रतिनिधी- कीशोर गरुड
भारतरत्न महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती शहरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.शहरातील भिमनगर जयंती ऊत्सव समिती अंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.तसेच फुलेनगर LFC चौकांत चार दिवस विविध कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना देण्यात आली.क्रांतीनगर,शिक्षक काॅलनी,कळंब रोड,शहीद रामदास गायकवाड मंडळ यांचे विविध कार्यक्रम होऊन 14 एप्रीलला संध्याकाळी आकर्षक रोषणाई सह वाद्याच्या वादणाने शाही मिरवणुकी केज शहरातील विविध भागातुन निघून डाॅं.बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करण्यात आले.