
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठान व नागरगावं ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली तर नागरगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नागरगाव ग्रामपंचायत चे प्रथम नागरिक सरपंच जयश्रीताई रणदिवे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे मा संचालक अनिल शेठ शेलार यांच्या हस्ते करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन नितिन डीखळे व विजय कांबळे यांनी पुष्पहार घातला .तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच हरिभाऊ शेलार, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली तर राज्यघटना ही सर्व समानतेचे व एकतेचे प्रतीक आहे भारत देशाला एकसंघ ठेवण्याचे काम या राज्यघटनेने केलेले आहे त्यामध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत आणि या घटनेवरच भारत देश चालतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ज्यांची फक्त भारत देशातच नाही तर जगाच्या पाठीवरती १५२ देशांमध्ये जयंती साजरी केली जाते अशा महामानवांना आज आम्ही विनम्र असे अभिवादन करत आहोत .
सदस्य मा सरपंच भाऊसाहेब साठे यांनी आपल्या मनोगतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना व भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या व त्यांना विनम्र अभिवादन केले . याप्रसंगी उपसरपंच शरद नाना चव्हाण , मा उपसरपंच सदस्या अर्चनाताई चांगदेव वाघमोडे, उप सरपंच सगण नारनोर, मा चेअरमन शरद अण्णा साठे, मा उपसरपंच कमलाकर साठे, विलास नाना शेलार , आर्जून नारनोर, चांगदेव वाघमोडे, ग्रामसेविका अनिताताई कदम , नागरगावं विका सेवा सोसायटीचे संचालक माऊली पाटोळे, आप्पासाहेब रणदिवे, दादासाहेब थोरात, नागरगावं वि का सेवा सोसायटी संचालक अशोक खुळे ,शुभम शेलार, विश्वनाथ नाना शेलार, इत्यादि मान्यवर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदा पाडळे, सचिव सुधीर डिखळे, नितीन डिखळे, सागर कांबळे, प्रदीप कांबळे, लहुकुमार पाडळे,नितीन कांबळे ,सुनील कांबळे , किरण डिखळे, तेजस डिखळे ,ओंकार डिखळे, मयूर डिखळे अविनाश डिखळे , सचिन कांबळे, गोरख साळवे, संपत कांबळे, गणू गावडे, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नागरगाव ग्रामपंचायतला एक निवेदन देण्यात आले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हे २६ जानेवारीला करण्यात यावे तसेच भारत देशामध्ये संपूर्ण संविधान दिन म्हणून साजरा होत असून तो नागरगावं ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले व याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत चे सर्व सदस्य पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आले. आभार विजय कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन लहुकुमार पाडळे यांनी केले .