
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोथरूड ( पुणे शहर )- धनाजी साठे
कोथरूड:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोथरूड आगारामध्ये पंचशिल बुद्धविहार समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.
पंचशील ध्वजारोहण प्रमुख पाहुणे कदम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच भगवा ध्वजारोहण आगार अभियंता विलास मते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच पंचशील ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते नामदेव ओव्हाळ व कुमार घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजाचे ध्वजारोहण हरीश ओहळ व बाबुल नेटके यांच्या हस्ते करण्यात आले.
सामूहिक वंदना कुमारी कल्याणी गणेश कदम व संग्राम गणेश कदम या बालकानी घेतली, त्याप्रसंगी उपस्थित पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कोथरूड चे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज दादा सुतार उपस्थित राहून भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी विलास कांबळे साहेब, प्रताप साहेब, शैलेंद्र चव्हाण, विनोद गायकवाड, बापू गायकवाड, सागर कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन पुणे शहर अध्यक्ष – नागेशभाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष- गणेशभाऊ कदम, कोथरूड आगारचे अध्यक्ष दीपकभाऊ तेली, तुकाराम कांबळे ज्ञानोबा बोडके, विष्णू बुक्तर, विश्वजीत सूर्यवंशी, अशोक मोरे, किशोर शिवशरण, राजेश शीलवंत अदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कर्मचारी व मोठ्या प्रमाणात भीमसैनिक यांनी उपस्थिती दाखवली.