
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी सुरक्षा दल
आळंदी शहराच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 134 व्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय आळंदी या ठिकाणी प्रतिमा पूजन करून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रतिमापूजनासाठी प्रमुख उपस्थित आळंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली फुले मॅडम,आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर अधिकारी खेडेकर मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमात संघटनेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला आघाडी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले,कार्यक्रमाचे सर्व नियोजन तृतीयपंथी सुरक्षा दल आळंदी शहराच्या वतीने करण्यात आले, या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला आणि शिबिरासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले.