
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक -अवधूत शेंद्रे
पत्रकार जनार्दन ढोक, शेख युसुफ, सय्यद अफसर अली, ओंकार दंडाळे, अवधूत शेंद्रे, मंगेश सोनारे, सुनील साबळे, गजानन भोरे, अमोल सोटे, राहुल गजरे, अनिकेत ठाकरे,निलेश कोहळे हे पत्रकार ठरले सन्मानाचे मानकरी
वर्धा -आष्टी: तालुक्यातील नामांकित असलेल्या हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ११ एप्रिल २०२५ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते १४ एप्रिल २०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समता पर्व म्हणून साजरी करण्यात आली. या समतापर्वाच्या औचित्याने आष्टी तालुक्यातील पत्रकार बांधवांना समता पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरवविन्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा स्मारक समितीचे विद्यमान अध्यक्ष भरत वणझारा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष गजानन भोरे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष सुनील साबळे, ज्येष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी जनार्दन ढोक, आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश जोशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आले. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन आणि वाईट गोष्टीवर प्रहार करून समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात. तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणून आपण त्यांचा समता पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करीत आहोत असे आपल्या प्रास्तविकेमधून विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी.नाकतोडे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आम्ही आवाज उठवीत असतो आणि लोकांमध्ये जनमत निर्माण करण्याचं कार्य आम्ही अहोरात्र करीत असतो. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाने गौरव सोहळा आयोजित करून आमचा उत्साह द्विगुणित केला असे गौरव उद्गार प्रमुख अतिथी गजानन मोरे यांनी काढले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात भरत वणझारा यांने आष्टी ही क्रांतीभूमी असून येथे शहिदांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी आम्ही हुतात्मा स्मारक समिती मार्फत अनेक वर्षांपासून लढा देत असून या लढ्याला यशप्राप्ती व्हावी करीता पत्रकार बांधवांनी सुद्धा आवाज उठवावा असे आवाहन याप्रसंगी केले. यानंतर समता पर्व निमित्त विद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये कु.उन्नती खोब्रागडे, रिजाकौशर शहा, कु.लावण्या पोतोडे, कु.वांशिका वसुले, कु. खुशी चंदीवाले, मंथन ढवक, कु.तमन्ना मनोहरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी आष्टी तालुक्यातील पत्रकार सत्कार बांधवांचा समता पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हुतात्मा स्मारक समितीचे सचिव विनायक होले, उपाध्यक्ष डॉ.किशोर गंजीवाले, कोषाध्यक्ष राजाभाऊ सव्वालाखे, सहसचिव शंकर कोल्हे, सदस्य शंकरराव नागपुरे,अर्पित मालपे, प्राचार्य डॉ.निमगरे व हुतात्मा शैक्षणिक परिवारातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.