
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
दिनांक 16 एप्रिल रोजी देगलूर येथील नगेश्वर मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता आर्य वैश्य मित्र मंडळ देगलूर तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .वेदवेदांग चक्रवर्ती वेदशास्त्र परमपूजनीय गणेश्वर शास्त्री द्रविड (पद्मश्री पुरस्कार ) यांचा तसेच देगलूर नगरीचे भूमिपुत्र आर्य वैश्य भूषण व समाजसेवक दिनेश संगमनाथराव मुनगिलवार यांचा महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभेच्या सदस्य पदी निवड झाल्या निमित्त तसेच भावनाताई दाशेटवार भारतीय जनता पार्टी देगलूर
यांचा बाळ शास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार संघ यांच्या वतीने कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार 2025 पदी निवड झाल्याबद्दल धनपाल सुर्यनारायणजी आमदार, निजामाबाद, तेलंगाणा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .याप्रसंगी प्रमुख अतिथी ह. भ .प .चंद्रशेखर महाराज देगलूरकर , नंदकुमार गादेवार (अध्यक्ष आर्य वैश्य महासभा )गोविंद बिडवई ( महासचीव )दिलीप कंदकुर्ती (उपाध्यक्ष )सूर्यकांत शिरपेवार (अध्यक्ष बांधकाम समिती ) माधुरीताई कोल्हे ( महिला अध्यक्ष )बबीता ताई अष्टेकर ( महासचीव ) आदी मान्यवर उपस्थित होत.तसेच देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते