
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य ग्रामीण भागातील मौजे नांदुरा येथील
जमात-ए-इस्लामी हिंद, नांदुरा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल येथे “सद्भावना ईद मिलन” या सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध धर्मीय, संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज उबैद साहेब यांच्या पवित्र कुरआनच्या तिलावतीने झाली. त्यांच्या अर्थपूर्ण आणि सुरेल आवाजात केलेल्या तिलावतीमुळे सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
सुहैल अमीर शेख (सदस्य, राज्य सल्लागार मंडळ, जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र)
सुहैल फुरकान (जिल्हाध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद, बुलढाणा)
मनोज गुरुजी (प्रवक्ते, गुरुदेव आश्रम)
सुरेश दादा पेटकर (अध्यक्ष, पत्रकार संघ, नांदुरा)
डॉ. सचिन सर (प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, SPM कॉलेज)
नवाब जिया साहेब (मुतवल्ली, केंद्रिय मशीद)
रफिक सेठ साहेब (अध्यक्ष, एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी)
डॉ. जुनैद कमरान (अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद, नांदुरा)
प्रमुख भाषणे:
कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण सुहैल फुरकान यांनी केले. त्यांनी इस्लामी मूल्यांचा उल्लेख करत समाजात सहिष्णुता, ऐक्य आणि सलोख्याची गरज अधोरेखित केली.
सुरेश दादा पेटकर यांनी, जमाअत ए इस्लामी हिंद नंदुरा च कौतुक केला,
अध्यक्षीय भाषणात सुहैल अमीर शेख यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत विविध धर्मांतील संवाद, सहकार्य आणि शांततेचा प्रसार करण्याची गरज मांडली. त्यांनी सांगितले की, “इस्लाम हा केवळ एका धर्माचा नव्हे तर संपूर्ण मानवतेचा कल्याणाचा मार्ग दाखवतो.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन खान सर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले.
हा कार्यक्रम नांदुरा शहरात सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता आणि मानवी मूल्यांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला.