दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य शहरातील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे
15 एप्रिल “जागतिक कला दिन” या दिनाच्या औचित्याने यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रेडिओच्या परभणी आकाशवाणी केंद्रावर घेऊन जाऊन पूर्ण आकाशवाणी केंद्रावरील चालणाऱ्या कार्यपद्धती व रेकॉर्डिंग व प्रसारण कशी होते याबाबत विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी आकाशवाणी केंद्रास भेट दिली.
दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध ऐतिहासिक तसेच भौगोलिक स्थळांना भेट देण्याचे शैक्षणिक उपक्रम राबविला जातो.पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या अंगी नवनवीन कौशल्य आत्मसात करणे,क्षमता वृंध्दीगत करणे, जिज्ञासू वृत्ती,चिकित्सक व सर्जनशील विचार मांडण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे, लोकशाही मूल्य, नैतिक मूल्य,ज्ञानाधारित मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्यासाठी व एकविसाव्या शतकातील कौशल्य, नेतृत्व गुण,संघ भावना सामाजिक कार्याचा सहभाग हे मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी अशा कार्यक्रमातून आपोआप रुजले जातात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या ज्ञानाचा शोध घेणे,संभाषण कौशल्याचा विकास करणे.यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. स्वातंत्र्य काळात सर्वात प्रभावी प्रसार माध्यम म्हणून रेडिओ ची ओळख होती आजही ती कमी झाली नाही… एकाच वेळी सर्वांपर्यंत सर्वात जलद गतीने एखादा संदेश प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे आकाशवाणी होय. आणि या केंद्रास यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी अनुमती मिळाल्याबद्दल नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पटेल.भविष्यात यशवंत चे विद्यार्थी चांगले निवेदक चांगले वार्ताहार आकाशवाणीवर सुंदर संवाद साधणारे सुलभक तयार होतील.
आकाशवाणीची लोकप्रियता वाढण्यासाठी शालेय जीवनातच आकाशवाणीचे महत्व व कार्य पटवून देण्यासाठी कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आकाशवाणीवर, शैक्षणिक, सांस्कृतिक, बातम्या आणि विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात.व्याख्याने आणि चर्चासत्रे,संगीत, नृत्य आणि नाटक यांचे प्रसारण,ताज्या बातम्या, माहिती आणि विविध शृंखलेतील कार्यक्रम
चर्चा, मुलाखती,विविध भरती अशा नानाविध कार्यक्रम सादर होतात. आकाशवाणीचे ग्रंथालय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तिथे असलेले संग्रहित गाण्याचे सीडी जुन्या काळातील मोठी प्लेट असलेले सीडी विद्यार्थ्यांना दाखविले .तसेच
बालमंडळ, रेशीमगाठी, साहित्य संस्कृती, नाट्यरंग, फोन वरील परभणी कट्टा या कार्यक्रम बाबत माहिती, आकाशवाणी वरून कशाप्रकारे कार्यक्रमाचे रेकॉर्ड केले जाते त्याचे प्रसारण कसे केले जाते याबाबत निवेदिका वैशाली जोशी यांनी
यशवंत विद्यालयातील साक्षी गंगथडे,
दिपाली अंभोरे,समीक्षा तुडमे,स्नेहल साखरे,आदिती गिरी,धनश्री चाटे,आराध्या पाटील,
दक्ष पाटील या विद्यार्थांना सखोल माहिती दिली.
यावेळी प्रसारण अधिकारी मोहित कुहाड, निवेदिका अपर्णा पारवेकर, निवेदिका वैशाली जोशी, निवेदक आनंद पोहनेरकर, ग्रंथपाल भास्कर थोरात आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे आकाशवाणीस भेट दिल्याबद्दल अभिनंदन केले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक व अभिनंदन केले.
