
दैनिक चालू वार्ता अहमदपुर प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर (अहमदपुर):-
तालुक्यातील अहमदपूर शहरा लगत असलेल्या मौजे थोरलेवाडी येथील कुमारी धनश्री बालाजी फुलमंटे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई येथून एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण केली असून, त्यांचा हा गौरवास्पद यशाचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
धनश्री हिने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात आपलं स्वप्न पूर्ण केलं. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम वर्षाच्या निकालात ती यशस्वी झाल्याची बातमी कळताच तिच्या गावी थोरलेवाडीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
धनश्रीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बी.एस.एफ. केंद्रीय विद्यालय, चाकूर येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण अहमदपुरातील कस्तुरबा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे पार पडलं. ग्रामीण भागातून येऊनही तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिद्दीचं जिवंत उदाहरण उभं केलं आहे.
तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तिचा सत्कार करून गौरव केला असून, गावातील तरुणींमध्येही ती प्रेरणास्रोत ठरली आहे. तिच्या कुटुंबीयांचं आणि शिक्षकांचं देखील विशेष योगदान लाभल्याचं तिने सांगितलं.
धनश्रीचं हे यश केवळ तिचं वैयक्तिक यश नसून, ते संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
या वैद्यकीय शिक्षणाबरोबर तालुक्यातील विविध स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे..