
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची कोडी होण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन करत आहे. भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. भारतीय वायुसेना राफेल आणि सुखोई विमानांनी युद्धाभ्यास करत आहे. त्यातच बांदीपोरा येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यात लष्कराला मोठे यश मिळाले आहे.
बांदीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे. दरम्यान यामध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराने लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. भारताच्या जवानांनी लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लालीचा खात्मा केला आहे. बंदिपोरा येथे सैन्य दलाला हे यश मिळाले आहे. या संपूर्ण परिसराची लष्कराने कोंडी केली आहे. सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.
भारतीय लष्कराला या टॉप कमांडरचा शोध होता. अखेर आज त्याला ठोकण्यात सैन्य दलाला यश आले आहे. मात्र या चकमकीत भारताचे २ जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल द्विवेदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. तर राहुल गांधी देखील पहलगाम दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळीच बांदीपोरा जिल्ह्यातील कलपुरा भागात सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
सीमारेषेजवळ उडाले ‘राफेल’ जेट्स
भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर काल सर्व पक्षांची एक बैठक देखील सरकारने घेतली आहे. मात्र आता भारतीय वायुसेना अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. भारतीय वायुसेनेने ‘आक्रमण’ ऑपरेशन ड्रिल केले आहे. ‘आक्रमण’ ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक अशा राफेल जेट्सच्या नेतृत्वात आघाडीच्या लढाऊ ताफ्याचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे दोन राफेल स्क्वॉड्रन तैनात आहेत. ही अत्याधुनिक विमाने सध्या सुरू असलेल्या सरावाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले.
सुरक्षा विभागाशी संबंधित सूत्रांनी एका वृत्तवाहिणीशी संवाद साधतान याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेने आपली अनेक संसाधने सेंट्रल सेक्टरमध्ये नेण्यात आली आहेत. भारतीय वायुसेना सपाट आणि डोंगराळ प्रदेशासह विविध परिस्थितींमध्ये सराव करत आहे. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि रॅम्पेज आणि रॉक्स सारख्या लांब पल्ल्याच्या अचूक स्ट्राइक सिस्टीमसह भारतीय वायुसेनेने दक्षिण आशियाई प्रदेशात आपली ताकद वाढवली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ‘आक्रमण’ सराव होत असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.