
प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय !
आमचा केंद्र सरकरला प्रश्न आहे की तुम्ही ठोस कारवाईकरणार आहात का हे तुम्ही सांगणार आहात का? हे कागदी घोडे नाचवून चालणार नाही. सध्या आर्मी तुम्ही सांगेल तो आदेश मानायला तयार आहेत.
फक्त तुमच्या आदेशाची वाट पाहत आहेत. मात्र, यासाठी राजकीय निर्णयक्षमता तुमच्याकडं आहे का असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दोन मे रोजी मुंबईत हुतात्मा स्मारकासमोर आम्ही शांततेच्या मार्गाने मार्च करणार आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर काही ठोस कारवाई होणार की नाही याबद्दल आम्ही सह्यांची मोहिम घेणार आहोत. ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यावेळी सही करावी. दरम्यान, यामध्ये आम्ही पक्षाचा झेंडा वापरणार नाहीत. राष्ट्राचा ध्वज असणार आहे. तसंच, इतर पक्षाच्या लोकांना यायलाही काही हरकत नाही. फक्त त्यांनी यावेळी राष्ट्रध्वज घेऊन यावा, आपल्या पक्षाचा ध्वज घेऊन येऊ नये.
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई करावी आणि कारवाई करावी यासाठी काही पर्याय असतील तर स्वीकारले पाहिजेत असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. सध्या काहीतरी ठोस निर्णय घेताना तुम्ही सर्व तयारी दाखवली पाहिजे.
सध्या या घटनेनंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं दिसून येत आहे. कारण आपली आर्मी कोणत्याही कारवाईला तयार असते. परंतु, त्यांना तसा आदेश मिळणं महत्वाचं आहे. तसंच, आपलं नाक कापलेलं असताना आपण का गप्प बसायचं असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. आता दोन मे रोजी आंबेडकर मुंबईत शांततेत आंदोलन करणार आहेत.