
बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत !
बाबा वेंगा या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली, त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 साली बल्गेरियामध्ये झाला होता.
त्यांचं पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होता. त्यांच्यासंदर्भात असा दावा केला जातो की, त्या एका वादळात सापडल्या होत्या, या वादळामुळे त्यांना आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. मात्र त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 साली झाला, त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली.
बाबा वेंगा यांच्याबाबत असा दावा केला जातो की, त्यांनी हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला आणि जपानमध्ये आलेल्या त्सुनामी संदर्भात भाकीत केलं होतं. ते खरं ठरलं. बाबा वेंगा यांनी 2025 बाबात देखील मोठं भाकीत केलं आहे. 2025 मध्येच जगाच्या अंताला सुरुवात होईल. अनेक शक्तिशाली भूकंप होतील. काही देशांमध्ये महापूर येतील, भीषण युद्ध होईल, या युद्धाचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशांना बसेल, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आता बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे. आणखी तीन वर्षांनंतर म्हणजेच 2028 ला जगामधून उपासमारी पूर्णपणे संपुष्टात येईल, याशिवाय तंत्रज्ञानामध्ये एवढी प्रगती होईल की, मनुष्य शुक्र ग्रहावर जाण्याची तयारी करेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत देखील मोठं भाकीत केलं आहे. एआय तंत्रज्ञानामुळे माणवाचं आयुष्य अधिक सुखकर होईल, आयुष्यात प्रगती होईल, मात्र त्यामुळे अनेक गुंतागुतींच्या समस्या देखील निर्माण होतील असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
बाबा वेंगा यांचे काही जगप्रसिद्ध भाकीतं
युरोप वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला जाईल
20043 पर्यंत युरोपमधील अनेक देशांमध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित होईल
2028 पर्यंत जगातून उपासमारीची समस्या संपुष्टात येईल
एआय तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.
लवकरच मनुष्य शुक्र ग्रहावर जाण्याची तयारी करेल
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)