
IPL च्या इतिहासात 28 एप्रिल 2025 ची संध्याकाळ नेहमी लक्षात ठेवली जाईल. कारण अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकलं. T20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे.
सोबतच T20 मध्ये वेगवान शतक झळकवणारा तो पहिला भारतीय बनला आहे. वैभव सूर्यवंशीच्या या शतकानंतर सोशल मीडियावर फक्त त्याच्या नावाची चर्चा आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशिवाय जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटुंनी या युवा क्रिकेटरच कौतुक केलय. सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट केली आहे. सचिनने वैभवच्या शतकाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्या इनिंगबद्दल विस्ताराने लिहिलय.
“वैभवचा बिनधास्त अप्रोच, बॅटचा स्पीड, लेंथ लवकर समजून घेणं आणि चेंडूची एनर्जी ट्रान्सफर करण्याची क्षमता हीच त्याच्या शानदार इनिंगची रेसिपी आहे” अशा शब्दात सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीच कौतुक केलय
तुम्ही 14 वर्षाचे होता, तेव्हा काय करत होता?. हा मुलगा जगातल्या बेस्ट गोलंदाजांचा सामना करत आहे. वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा! निडर होऊन खेळतोय. पुढच्या पिढीचा असा खेळ पाहून अभिमान वाटतो” अशा शब्दात युवराज सिंगने वैभव सूर्यवंशीच कौतुक केलं.
वैभव सूर्यवंशी उत्तम टॅलेंट. फक्त वयाच्या 14 व्या वर्षी शतक झळकवण विश्वास बसत नाही. नेहमी चमकत रहा भावा” अशा शब्दात मोहम्मद शमीने वैभवच कौतुक केलं.
वैभव सूर्यवंशीच्या आधी IPL मध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक यूसुफ पठानने झळकवलं होतं. यूसुफ पठानने 13 मार्च 2010 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावलं होतं. “आयपीएलमध्ये भारतीय म्हणून सर्वाधिक वेगवान शतक झळकवण्याचा माझा रेकॉर्ड मोडल्याबद्दल वैभव सूर्यवंशीच अभिनंदन. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने हा रेकॉर्ड तोडला. ही गोष्ट मला खास वाटली. या फ्रेंचायजीमध्ये युवकांसाठी काहीतरी जादू आहे” अशी यूसुफ पठानने X वर पोस्ट केली आहे.