
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या स्थळावरील विविध पर्यटकांनी केलेल्या व्हिडिओतून एक- एक सत्य समोर येऊ लागले आहे. एका व्हिडिओमध्ये “अल्लाहू अकबर” घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पर्यटकांसह स्थानिक लोकांची एनआयएच्या वतीने चौकशी केली जात आहे. सर्वाना समन्स बजावून नेमकी घटना कशी झाली, त्यावेळी तुम्ही कुठे होतात, यासह अनेक बाजूंचा तपास केला जात आहे.
झिपलाइन ऑपरेटरला पुन्हा चौकशीसाठी बोलावले
त्यातच आता ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली. त्या ठिकाणी असलेल्या झिपलाइन ऑपरेटरला आता पुन्हा बोलावण्यात आले आहे. तपास यंत्रणा आणि पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. त्याचे दुसरे कारण, म्हणजे, ऋषी भट्ट नावाच्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुढे आल्यानंतर त्यामध्ये सदर ऑपरेटर हा घोषणा देत होता. तर त्याच्या घोषणेनंतरच गोळीबाराला सुरूवात झाली, असा दावा देखील केला जात आहे.
ऋषी भट्ट नावाच्या व्यक्तीने काय केला दावा
ऋषी भट्ट नावाच्या व्यक्तीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, एका झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाहू अकबर” असे ओरडले आणि त्यानंतर लगेचच गोळीबार सुरू केला. ते झिपलाइनवर चढण्यापूर्वी त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार जण आधीच सुरक्षितपणे गेले होते. त्यावेळी भट्ट यांनी जो व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाहू अकबर” म्हटले नव्हते. परंतु, भट्ट यांनी दावा केला की जेव्हा ते झिपलाइनवर होते तेव्हा ऑपरेटरने तीन वेळा ओरडले आणि काही वेळातच गोळीबाराला सुरुवात झाली.
प्रत्यक्षात गोळीबार सुरू झाल्याचे लक्षात येण्यासाठी सुमारे पंधरा ते वीस सेकंद लागले. भट्ट यांच्या मते, त्यांच्या व्हिडिओमध्ये एक माणूस खाली पडताना दिसला, ज्यामुळे त्यांना काहीतरी गंभीर गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितले की त्यांनी नंतर त्यांची झिपलाइन दोरी थांबवली, सुमारे 15 फूट उंचीवरून खाली उडी मारली आणि त्यांच्या पत्नी आणि मुलासह ते त्या ठिकाणाहून पळाले. त्यावेळी त्यांना जीव वाचवणे एकमेव उद्देश होता. त्यामुळे घटनास्थळारुन लांब जाण्यात त्यांना यश मिळाले.
26 पर्यटकांचा घेतला जीव
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यात स्थानिक दोघांचा असे मिळून 28 लोकांना प्राण गमवावे लागले. हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देशभरात संतापाची लाट पसरली आहे.