दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड /ग्रंथालय भारती देवगिरी मराठवाडा प्रांताची बैठक शनिवारी दिनांक २८ जून रोजी जीवन विकास वाचनालय भा.बा.आर्वीकर सभागृहात छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली आहे.बैठकीचे अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांताचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पाठक होते या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष डॉ राजशेखर बालेकर केंद्रीय सचिव सुनिल वायाळ , चंद्रकांत जोशी ,सचीन कोंडेकर यांनी मार्गदर्शन केले आर आर फाऊंडेशन या संस्थेच्या ग्रंथ निवड समिती मध्ये डॉ चंद्रकांत जोशी यांची तसेच राज्य ग्रंथालय संघाचे ग्रंथ निवड समिती मध्ये रवींद्र पांडे आणि डॉ आशुतोष देशपांडे, ज्योत्स्नाताई कोल्हटकर आणि राज्य सरकारकडून नवीन स्थापन करण्यात आलेल्या सुधारणा समिती मध्ये डॉ. राजशेखर बालेकर सर यांची निवड करण्यात आली आहे हि ग्रंथालय भारती साठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले गुलाबराव मगर यांची ग्रंथ निवड समिती मध्ये आणि नुकतीच राज्य सहकारी परीषद महाराष्ट्र राज्याचे संचालक पदावर अविरोध निवड झाली यासाठी अभिनंदन करून सत्कार करण्यात आला ग्रंथालय भारती चा संघटनात्मक बांधणी साठी, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी गठित करण्यात यावी, प्रांत स्थरावरील जिल्हा स्तरावरील बैठक नियमितपणे व्हाव्यात, ग्रंथालय भारती संघटनेचे सर्व कार्यक्रम, उपक्रम आगामी काळात चांगल्या पध्दतीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ठरले या बैठकीत ग्रंथालयासंदर्भातील विविध प्रश्नावर व्यापक यावेळी चर्चा करण्यात आली
याप्रसंगी डी बी देशपांडे ,मनोज मुळे सूर्यकांत मालीपाटील, सतीश टाकळकर विचार व्यक्त केले प्रास्ताविक आणि संचालन किसनराव वाडीकर यांनी तर आभार प्रदर्शन .सुर्यकांत मालीपाटील यांनी केले आहे. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .
