
दैनिक चालू वार्ता चाकूर प्रतिनिधी -किशन वडारे
_____________________________
चाकूर पोलीस ठाणे चाकूर येथे पोलीस अधीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते चाकूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक मामडगे व महिला पोलीस नाईक श्रीमंगले यांची नुकतीच हवालदार पदावर बढती झाल्याचे घोषित करून दोन्ही कर्मचाऱ्यांना हवालदार पदाची फीत लावून सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व सहायक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते दोन्ही कर्मचाऱ्यांना हवालदार पदाची फीत लावून सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे व उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
पदोन्नतीनंतर पोलीस हवालदार मामडगे व महिला पोलीस हवालदार श्रीमंगले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान आमच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळालेली पावती असून आम्ही पुढेही निष्ठेने काम करणार आहोत.” त्यांनी आपल्या वरिष्ठांप्रती व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचा कार्यतपस्वी सेवेबद्दल गौरव व्यक्त करण्यात आला.
सदरील पदोन्नतीमुळे चाकूर पोलीस ठाण्यात समाधानाचे, सन्मानाचे व प्रेरणादायी वातावरण तयार झाले असून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकौशल्याचा आदर्श ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.