
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा- आष्टी :- नजीकच्या पारडी येथील व आजू बाजूच्या परिसरातील आष्टीला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बस फेरी सुरू करण्याची मागणी आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे त्यात असे म्हटले आहे की, आष्टी ते थार, पारडी या मार्गावर रस्ता डांबरीकरण मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वरील मार्गावरील बसेस बंद आहे त्याचा फटका तालुक्याच्या आष्टी येथे शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे परंतु अजूनही त्या महामार्ग कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे सोयीरसतुक नाही अधिकाऱ्यांना कमिशन देऊन मोकळे झाल्याने या संदर्भात अधिकारी वर्गही मूग गिळून बसला आहे आणि यावर देखरेख करणारा संबंधित विभाग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यात आनंद मानतो आहे आणि परिसरातील लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्येविषयी बोलण्यास तयार नाही या मार्गावरील गावात एखादा जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास जागेवरच गतप्राण झाल्याशिवाय गत्यंतर नाही असे बोलले जाते यासाठी निदान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विद्यार्थ्यांनी पुढे येत तळेगाव आणि आर्वी आगार प्रमुखांना एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे त्यात पारडी ते आष्टी सकाळी ६ :१५ व १० : ३० जाने आणि परतीच्या बस फेऱ्या आष्टी ते पारडी सकाळी ११: ३०, १२ :३०,दुपारी ४:०० आणि ५:३० वाजता अश्या बसलेल्या अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे चैतन्य हिरुडकर, सारंग चाफले, दुर्गेश सरोदे, दीप दातीर, हर्ष ढबाले, रोहन उईके, गौरव राऊत, हर्षाली टिपले सलोनी चाफले, प्रवंश सकरडे, विजय हिरुडकर, मोनाली रेवतकर, तनिषा साबळे, श्लोक गिरमकर, अक्षय गिरमकर, निकिता पापडकर, वेदिका बालपांडे, अथर्व टिपले,चंद्रशेखर टिपले, सनी टिपले अशा वीस विद्यार्थ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत सदर निवेदनाला त्यांच्या पालकाचे पूर्ण समर्थन असून पालक सुद्धा उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे