
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
झाडे लावा झाबडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा हा संदेश शिक्षक सेनेच्या वतीने पक्षप्रमुख स्वतःपर्यावरण प्रेमी व वृक्षप्रेमी आसल्यामुळे
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात वृक्षारोपण प्रेरणा मास दि.27 जून ते 27 जुलै वृक्षारोपन व संवर्धन,सांगोपण अभियान राज्य अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे.या अभियान अंतर्गत जि.प.प्रा.शाळा भाद्रातांडा ता.लोहा जि.नांदेड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका शाखा लोह्याच्या वतीने आज दि.10 जुलै रोजी पिंपळ चिंच गुलमोहार या वृक्षाचे वृक्षारोपण राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण ,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष धोंडीबा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शिक्षक सेनेचे ता.अध्यक्ष संभाजी पवार या शाळेच्या मु.अ.सौ.रंजमा ,शिक्षक सेनेचे,लहू पंदलवाड राहूल बनसोडे,राजेश पवार,बाळू पवार सह विद्यार्थी पालक उपस्थित होते