
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : दक्षिण पुण्यातील कात्रज येथील गुजर निंबाळकर वाडी खोपडे नगर येथे मंगळवारी (दि.०८) एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रीलमधून एक चार वर्षाची चिमुकली खेळता खेळता बाहेरच्या बाजूला अडकून लटकत असल्याचे कानावर पडताच मुळातच पुणे महानगरपालिकेत अग्निशमन विभागात तांडेल पदावर कार्यरत असलेले आणि त्याच इमारतीचे रहिवासी असलेले योगेश अर्जुन चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत त्या चिमुरडीची त्यातून सुखरूप सुटका केली. आणि मोठी अनुचित घटना घडण्यापासून वाचली. सदरची बाब दखल घेण्यायोग्य व सामाजिक जबाबदारीचे भान जपणारी असल्याने सदर सेवक योगेश अर्जुन चव्हाण यांचा पुणे महानगरपालिका कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने कौतुकास्पद सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. महापालिका सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, उपअभियंता श्रीमती राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम तसेच कार्यालाकडील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.