
दैनिक चालु वार्ता माजलगांव प्रतिनिधी -नाजेर कुरेशी.
माजलगाव शहरात कॉलेज शाळा खुप आहे खेड्या गावातून विद्यार्थी मुली शाळेत जाताना येताना टुकार मुलाचा खुप त्रास सहन करावे लागत आहे त्यात मोटार सायकलने कट मारणे शिटी वाजवणे गाड़ी वेगात धावणे असे रोज प्रकार शाळेच्या गेट पशी किंवा रस्त्यावर होताना दिसत आहे म्हणून एस पि साहेबानी दामिनी पथक चालू करून माजलगाव नागरिकाना दिलासा द्यावा असे बोलले जात आहे.
पालक आपल्या मुली सुरक्षित राहावे म्हणून शाळेत शिक्षकांना सांगतात कि आमच्या मुली वर लक्ष राहू द्या परंतू बाहेर आम्हाला माहित नाही असे सर लोक सागुन मोकळे होतात
माजलगाव शहरात कॉलेज शाळा परिसरात चिड़ीमार कळस गाठला असून, महाविद्यालयीन, शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढल्या जात असल्याने अखेर सर्वसामान्य नागरिकांनी टवाळखोर व चिडीमारांचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे. भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी मेन रोडवरील शाळा मुलीचे कन्या महाविद्यालय कॉलेज जवळ मागील काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरालगत चिडीमार व टवाळखोर युवकांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलींची दिवसा ढवळ्या छेड काढणे,प्रकार होताना दिसत आहे दामिनी पथक यांचे फेरी मारून टुकार मुलाचा बंदोबस्त एस एस साहेब व पोलीस निरीक्षक यांनी माजलगाव शहरात दामिनी पथक स्थापना करुन मुलींची छेड काढणाऱ्याचा बंदोबस्त करावा अशी मांगणी दैनिक चालु वार्ता पेपरचे पत्रकार नाजेर कुरेशी यांनी पोस्टव्दारे एस पी साहेब बीड यांना निवेदन दिले आहे.