
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :
संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा उदगीर येथे 14 जुलै रोजी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. लातूर जिल्हा व उदगीर तालुका संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी, उदगीर यांना निवेदन सादर केले.
या निषेध सभेमध्ये वक्त्यांनी व्यक्त केले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत असलेल्या प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर विचारधारेवर आणि प्रगतीशील समाजरचनेवर आहे.
हल्ल्यात प्रवीण दादांवर साई फेकण्याचा प्रयत्न व काळं वंगण फासण्यात आले, ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी असून अत्यंत निषेधार्ह आहे, असे स्पष्ट मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.
________________________________________ हायलाइट ________________________________________
*संभाजी ब्रिगेडचा इशारा – हल्लेखोरांना अटक झाली नाही तर आंदोलन*
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांनी प्रशासनास ठणकावून सांगितले की,
“प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड यांनीही आपल्या भाषणात नमूद केले की,
“शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारच देशात शांतता, एकता व अखंडतेचा आधार आहेत. पण हे विचार दिशाभूल करण्याचे षड्यंत्र सध्या रचले जात आहे. हे थांबवण्यासाठी विचारांनी सज्ज समाज उभा करण्याची गरज आहे.”
प्रशासनाने ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना योग्य संरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
________________________________________
*निवेदन सादर, पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका*
संभाजी ब्रिगेडकडून उपविभागीय अधिकारी, उदगीर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या:
▪️प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
▪️हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी.
▪️सामाजिक नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण द्यावे.
▪️सामाजिक विचारवंतांवर होत असलेल्या अशा प्रकारच्या हल्ल्यांना आळा बसवण्यासाठी कायदेशीर यंत्रणा सजग ठेवावी.
या निषेध सभेला व निवेदन प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पुढील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते:
शिवश्री राजकुमार माने (जिल्हाध्यक्ष), शिवश्री उत्तमराव फड (विधानसभा अध्यक्ष), शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा (जिल्हा सचिव), शिवश्री व्यंकटजी थोरे (जिल्हा सहसचिव), शिवश्री मेहबूब सय्यद (जिल्हा संघटक), शिवश्री राजकुमार भालेराव (तालुका अध्यक्ष), शिवश्री शिवा पाटील (शहराध्यक्ष), शिवश्री निजामुद्दीन (व्यापारी आघाडी शहराध्यक्ष), शिवश्री सुरज आटोळकर, शिवश्री सावन तोरणेकर, शिवश्री बाबासाहेब एकुरकेकर, शिवश्री नरसिंग बनशेळकीकर, शिवश्री धम्म सागर, शिवश्री कृष्ण बिरादार, शिवश्री रामेश्वर बिरादार, शिवश्री श्रीकृष्णा बिरादार, शिवश्री प्रसाद बिरादार, शिवश्री महारुद्र, शिवश्री राम रावणगावे.