
दैनिक चालू वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : आज दि 15 रोजी अंबड- घनसावंगी रोड वरती वलखेडा पाटीजवळ फोर व्हीलर व दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात फोर व्हीलर ही क्रियेटा व दुचाकी पल्सर होती. हा अपघात समोरासमोर झाला असून यात दोन सख्या भावांना गंभीर जखमी झाली आहे .सदरील घटना ही आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली आहे .यात चार चाकी क्रमांक MH.34 BR 7011 व दुचाकी क्र MH.23 AM 4329 असून या अपघातात जखमींची नावे बाळू अशोक बरडे वय 38 व दीपक अशोक बरडे वय 25 दोघे राहणार खडकेश्वर तालुका अंबड असे आहे. घटनास्थळावरून नागरिकांनी अपघाताची माहिती 108 ला दिली असता.ॲम्बुलन्स द्वारे जखमींना अंबड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ. डमाळे व डॉ.श्रीकांत यांनी जखमी वरती उपचार केला आहे. या अपघातात बाळू यांना मांडीलाइजर झाली आहे तर दीपक बरडे यांना उजव्या पायाला फॅक्चर झाले आहे .अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात येथे जखमीवरती उपचार सुरु आहे.