
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर: येथील मानव्य विकास विद्यालय शाळेतील तीन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता 8 वी) घवघवीत यश मिळवत शिष्यवृत्ती धारक बनले आहेत. यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत . यामध्ये
1. संजना विजयराव मरखेले (जिल्ह्यातून 22 वी)
2. ओमकार किशनराव जाधव(जिल्ह्यातून 128 वा )
3. योगेश माधवराव मंगरूळे (जिल्ह्यातून 139 वा)
या सर्व शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित म्हणून,विद्यालयातील मुख्याध्यापक संतोष कोल्हे ,उपमुख्याध्यापक श्याम कोल्हे ,पर्यवेक्षक शरद हांद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.