
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -किशोर फड
बीड/अंबाजोगाई –
जवळगाव (ता. अंबाजोगाई) – आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील उपसरपंच लक्ष्मण भैय्या पवार यांच्या पुढाकाराने गरजूं महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास मा. पंचायत समिती अंबाजोगाईचे उपसभापती तानाजी भैय्या देशमुख, युवक नेते व समाजसेवक गणेश देशमुख, रजत जेधे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांमुळे गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, उपसरपंच लक्ष्मण भैय्या पवार यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी राबवलेले उपक्रम खऱ्या अर्थाने लोकसेवेचे दर्शन घडवणारे ठरले.