दैनिक चालु वार्ता म्हसळा( रायगड )प्रतिनीधी- अंगद कांबळे
म्हसळा – समाजसेवक कृष्ण महाडिक यांच्या प्रयत्नाने रायगड मधील ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण भेटावे त्यासाठी विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा उद्देश ठेवून समाजसेवक श्री कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नातून पीएम श्री रायगड जिल्हा परिषद प्रशाला भरडखोल येथील शाळेत जवळ जवळ साडे तीनशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून या शाळेला यापूर्वीही अर्थिक-दानशूर दाते व श्रीकृष्णजी महाडिक यांच्या प्रयत्नातून अनेक भौतिक सुविधा व प्रशस्त अशी इमारत बांधून देण्यात आलेली आहे तसेच या शाळेत शिकणाऱ्या मुलीची संख्या जवळ जवळ दीडशे ते पावणे १७६ इतकी असून या शाळेला लक्ष्मी देवी दमानी जीतमल चालमल दमाननी ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून स्वच्छता ग्रहाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती भरडखोर अध्यक्ष श्री संतोष गोविंद वाघे यांच्या हस्ते व ज्येष्ठ समाजसेवक तथा रायगड भूषण मा श्री कृष्णाजी महाडिक साहेब यांच्या उपस्थितीत पारपडले म्हसळा तालुक्यातील साळविंडे शाळेला ही आर्थिक सहकार्य केले असून विद्यार्थी शिकला पाहिजे काळा नुसार शिक्षणात बद्दल होत असतांना पालकांना आर्थिक जास्त त्रास होऊनय या साठी दमाणी ट्रस्ट च्या माध्यमातून संगणक, शिष्यवृत्ती, मुलींना सायकल, पेरोगान चप्पल, शालेय साहित्य, कपोस, वह्या, छत्री वाटप करण्यात आलेली असून श्री महाडिक साहेबाना यांच्या माध्यमातून प्राथमिक विद्यामंदिर तळे (दगडी) शाळा,माध्यमिक शाळा उसर, माध्यमिक शाळा बोरघर, जिजामाता शाळा आगरवाडा,माध्यमिक शाळा खरवली, प्राथमिक शाळा खरवली आदिवासी वाडी, रातवड हायस्कूल महाड, न्यू इंग्लिश स्कूल चनेरे रा. जि.प शाळा मांदाटणे अश्या जवळपास २९ शाळा महाडिक साहेबांच्या माध्यमातून थोरदेणगीदार व लक्ष्मी दमाणी थोरदाते च्या अर्थसाह्यतून करण्यात आले असून भरडखोल येथील स्वच्छता ग्रहाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती भरडखोर अध्यक्ष श्री संतोष गोविंद वाघे यांच्या हस्ते व ज्येष्ठ समाजसेवक तथा रायगड भूषण मा श्री कृष्णाजी महाडिक साहेब यांच्या उपस्थितीत पारपडले रायगड भूषण श्री महाडिक साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे ह्या स्तुत्य हेतूने मागील अनेक वर्षांपासून शाळाच्या वैभवात वाढ झालेली दिसून येत आहे यावेळी श्री यशवंत हरिचंद्र पावशे शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत रामा पाटील आनंद पांचाळ,शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होता
