
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमने-सामने येत आहेत. त्यात शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई या अधिवेशनात अनेकदा ठाकरेंच्या आमदारांना भिडताना दिसत आहेत.
गेल्यावेळी अनिल परब आणि देसाईंमध्ये तर आता वरूण सरदेसाई आणि मंत्री शंभूराज देसाईंमध्ये खडाजंगी झाली आहे.
शिंदेंचे देसाई ठाकरेंच्या सरदेसाईंना भिडले
मुंबईतील वांद्रे येथील जमीनीबाबत लवकरात लवकर आदेश काढावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार यांनी सभागृहात केली होती. त्यावर मंत्री शंभूराज देसाईंकडून आपेक्षित उत्तर न आल्याने वरूण सरदेसाई आक्रमक झाले. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाईंनी देखील आक्रमक पवित्रा घेत थेट ठाकरे सत्तेत असताना काय केलं असा सवाल केला.
वरूण सरदेसाई म्हणाले होते की, मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी जेवढं छापील होतं तेवढंच उत्तर दिलं. वरच्या सभागृहात वांद्र्यातील लोकांना पर्यायी जागा ही ठाण्यात देण्याचा विचार करतोय त्याचा काहीही उल्लेख देसाईंच्या उत्तरात नव्हता. त्यामुळे त्यांनी स्पश कालावधी आणि विशिष्ट वेळ सांगावी असं म्हणत वरूण सरदेसाई भडकले.
त्यावर त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाईंनी देखील आक्रमक पवित्रा घेतला ते म्हणाले की, 2019 ते 2022 पर्यंत मविआचं सरकार आणि होतं. तसेच स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा का नाही याबाबत निर्णय घेतला. आमची लाज काय काढता. तुम्ही काय केलं ते पाहा. दरम्यान यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.