
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींसोबत ट्रम्प यांनी आखली मोठी योजना…
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे. परंतु हे युद्धा एकांगी बनत चालले आहे. रशिया युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन, क्षेपणास्त्र, बॉम्ब हल्ले करत आहे.
यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थिती या युद्धामुळे जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे. युक्रेनच्या सुरक्षेसाठी चर्चा सुरु आहे. याच वेळी अमेरिका या युद्धात देखील उडी घेण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी वैयक्तिक रित्या युक्रेनला रशियावर हल्ला करण्यास परवानगी दिली आहे. अमेरिकेन लांब पल्ल्याची शस्त्रे युक्रेनला दिली आहे. ही शस्त्रे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर डागण्याची तयारी युक्रेन करत असल्याचे म्हटले जात आहे.
ट्रम्प यांची झेलेन्स्कींशी फोनवर चर्चा
ट्रम्प यांनी नुकतेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, ४ जुलै रोजी ट्रम्प यांनी झेलेन्स्कींशी फोनवरुन चर्चा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यानुसार, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना थेट तुम्ही मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गला लक्ष्य करु शकता का? असा प्रश्न केला आहे. अमेरिकेने लांब पल्ल्याची शस्त्रे युक्रेनियन सैन्याला दिली आहे. या अहवालानुसार, ट्रम्प रशियावर हल्ला करु इच्छित असल्याचे म्हटले आहे. यामुळे रशियाला युद्धबंदीच्या करार करण्यासाठी भाग पाडता येईल असे ट्रम्प यांचे मत असल्याचे दिसून येते.
डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर नाराज असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प रशियाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारत आहे. यापूर्वी त्यांनी अमेरिका आणि रशिय संबंध कमी करण्याचा आणि युक्रेनपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रशियावर अनेक निर्बंध लादण्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
रशियावर दबाव आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी युक्रेनला ३०० किलोमीटर पल्ल्याचे ATACMS क्षेपणास्त्रांचा वापराची परवानगी दिली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आता टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र देखील युक्रेनला पुरवण्याचा विचारात आहे. सध्या ट्रम्प रशियावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पुतिन शांतता कारारात सामील होतील असे मानले जात आहे.
युरोपीय देश युक्रेनच्या बाजूने
याच दरम्यान युरोपीय देशांनी देखील रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला तीव्र विरोध केला आहे. युरोपीय देशाने देखील अमेरिकेने रशियावर दबाव वाढवण्याची मागणी केली आहे. यामध्ये फ्रान्स, इटली, जपान, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांच्या समावेश आहे. सध्या या सर्व घडामोडींमुळे अमेरिका देखील रशिया-युक्रेन युद्धात उडी घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.