
मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा…
राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. विधिमंडळाच्या याबाबत माहिती देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कायदा आणणार असल्याचे सांगितले.