
राज्यात तब्बल 3 लाख रिक्त पदांवर मेगाभरती होणार…
राज्यातील तरुण-तरुणींना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील जवळपास 3 लाख रिक्त पदांवर मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये सध्या २,९७,८५९ पदे रिक्त असून ही एकूण पदसंख्येच्या ३० ते ३५ टक्के इतकी आहे. या सर्व रिक्त पदांवर सरळ सेवा व पदोन्नतीच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे.
दीडशे दिवसांचा कृती आराखडा पूर्ण झाल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mega Bharti 2025)
विधान परिषदेत सदस्यांनी नियम २६० अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, ‘शासकीय विभागांमध्ये बहुसंख्य भरती सरळ सेवेमार्फत केली जाते. बाह्य स्त्रोतांद्वारे पदे भरली जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
ते पुढे म्हणाले, ‘न्यायालयीन ड वर्गातील पदेही केवळ सरळ सेवेनेच भरली जातात. करार पद्धतीने नियुक्ती केल्यास त्या कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशासकीय अथवा वित्तीय अधिकार दिले जात नाहीत.’
दरम्यान, पदांची यादी, पात्रता अटी, परीक्षा पद्धती, MPSC व अन्य संस्था यांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल तयार केला जात आहे तसेच लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच काही पदांवर अनुकंपा तत्वावर नेमणूक, काही पदे MPSC मार्फत, तर उर्वरित सरळ सेवा पद्धतीने भरली जातील.
इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे MahaPariksha पोर्टल, MPSC वेबसाइट, आणि संबंधित विभागाच्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवावं. तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, आरक्षण धोरण यांचा आधीपासून अभ्यास करावा. याशिवाय कोणतीही बनावट जाहिरात वा लिंकवर विश्वास ठेवू नये