
जितेंद्र आव्हाडांची लातूरच्या राड्यावर प्रतिक्रिया !
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृह सुरु असतानाचा फोनवर रमी गेम खेळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कृषिमंत्रीच सभागृहात रमी गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकरी आणि जनतेच्या मनात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या चालू पत्रकार परिषदेत पत्ते उधळण्यात आले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण केली होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यावरुन लातूरमध्धे जोरदार राडा झाला. या मारहाणीमुळे राज्यभर अनेक ठिकाणी पडसाद उमटताना पाहायला मिळाले. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकार चिडले
प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत.नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश,हा सत्ताधारी वर्ग देत आहे.त्यांना इतकच सांगणे आहे की, सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! अशा प्रकारचे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत व्यक्त केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांना सुनील तटकरे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. लातूरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य राडा टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी चुकीच्या गोष्टींना समर्थन देणार नाही अस स्पष्ट केलं आहे.मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात घडलेला प्रकार निंदनीय आहे तटकरेंनी अशी नाराजी वक्त केली आहे. तसेच, कालच्या राड्यानंतर आज सुनील तटकरेंची धाराशिव दौऱ्यावर असताना सकाळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्चकर्त्यांसोबत बैठक पार पडली.