
दैनिक चालू वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यातील नायगाव येथे नागरिकांची सुदृढ आरोग्य आणि दृढ मानसिकतेची साठी आपणआमदार बबनराव लोणीकर व प्रशासनाच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आपल्या गावात आरोग्य उपकेंद्र व व्यायाम शाळाची नवीन इमारति बांधकामासाठी आणि साहित्यासाठी संबंधित कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे एका प्रसिद्धी माध्यमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मा.तालुकाध्यक्ष अविनाश राठोड यांनी सांगितले आहे.
पुढे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये पाटोदा,ढोकसाळ,दहिफळ खंदारे आणि तळणी उपकेंद्राला नवीन इमारत,आरोग्य साहित्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शारीरिक समृद्धी आणि मानसिक पकवता यासाठी युवा,युवती आणि नागरिकांची सुदृठेंसाठी आपण मंठा तालुक्यात विविध ठिकाणी व्यायाम शाळा त्याचप्रमाणे वाचनालयासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय जालना चा अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नायगाव उपकेंद्र अंतर्गत देवगाव खवणे,तळेगाव,के.वडगाव या गावाचा समावेश होतो.या शिवारातील गोरगरीब, सामान्य,दीनदुबळ्या लोकांना किंवा नागरिकांची आणि माता भगिनींची आरोग्य संदर्भात गैरसोय होऊ नये यासाठी आपण हे पाऊल हाती घेतले असल्याचे राठोड यांनी शेवटी सांगितले.