
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा)
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची अनेक एकरातील उभी पिके वाहून गेली आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी रविवार (दि.२७रोजी) तालुक्यातील रामतीर्थ गावाचा दौरा केला.नुकसानीच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीत अनेक ठिकाणी सोयाबीन,कापूस,तुर, मुग व इतर पिके पूर्णतः नष्ट झाल्याचे निदर्शनास आले.फक्त पिकेच नव्हे तर अनेक ठिकाणी विहिरीदेखील अतिवृष्टीमुळे ओसंडून वाहून गेल्या असून काही विहिरी पाण्याखाली जाऊन पूर्णपणे अदृश्य झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांचे पीके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.शेतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देखील धोक्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “ह्या अतिवृष्टीमुळे आम्ही अक्षरशः उघड्यावर आलो आहोत. नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची शासनाकडे मागणी आहे.”या भागात तातडीने मदत व पुनर्वसनाची आवश्यकता असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अश्या सुचना उदयसिंह बोराडे यांनी प्रशासनाला केल्या.
यावेळी उप तालुकाप्रमुख रामराव वरकड, अक्षयदीप वाघमारे, अजय गायकवा,बाळासाहेब देशमुख, भानुदास डाखोरे, कुलदीप झोल, व गावातील ग्रामस्थ