
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड प्रतिनीधी -अशोकराव उपाध्ये
कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर उपाध्ये गावी नागपंचमी निमीत्त दि२९ जुलै रोजी वारुळ पुजनाचा कार्यक्रम गावा बाहेरील शेताच्या बांधावर नागनाथ मंदीरा जवळ हभप नाना गुरुजी उपाध्ये यांचे मार्गदर्शनात भक्ती भावात घेण्यात आला .
पंचमीचे उपवास करीत गावातील शंभोशेष महाराज मंदीरात पाच दिवस घटस्थापन होऊन बाऱ्या गात रात्रीला भजनाचा कार्यक्रम सादर झाला . शंभोशेष महाराजांचे भक्तांनी या कार्यक्रमाला हजेरी दिली . हभप श्रध्देय नाना गुरुजी यांचे पुढाकारात याही वर्षी नागपंचमी उत्साहात साजरी झाली . शंभोशेष महाराज मंदीरापासून अरबाळी बाऱ्या म्हणत भक्ती भावाने गावा बाहेरील शेताच्या बांधावरील वारुळा पर्यन्त गेलेत तेथे वारुळाचे पूजन करून नागनाथ मंदीरात शंभो शेष महाराजांची आरती करण्यात आली सर्वांना प्रसाद देत भक्ती भावपूर्ण नागपंचमी साजरी झाली .