
दैनिक चालु वार्ता कारंजा तालुका प्रतीनीधी:अशोकराव उपाध्ये
कारंजा तालुक्यातील ग्राम जानोरी येथे दि २८ जुलै रोजी तालुका कृषी विभाग कारंजा यांच्या र्निदेशानुसार राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली . सदर प्रशिक्षणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकाविषयी तसेच आंतर पिक पद्धती व त्यांचे फायदे, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन अनिल भगत उप कृषि अधिकारी यांनी केले.सोयाबीन,तूर व कपाशी पिकावरील विविध किड व रोग याविषयी माहिती देऊन रासायनिक,जैविक व भौतिक पद्धतीने पीक व्यवस्थापन विषयी ज्ञानेश्वर वाळके सहाय्यक कृषि अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना विषयी अर्ज करण्याची प्रक्रिया त्याकरीता अंतर्गत उभारता येणारे उद्योग,लागणारी कागदपत्रे ;महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग योजना या विषयी मार्गदर्शन गजानन राऊत सहाय्यक कृषि अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.अनिल राठोड सहाय्यक कृषि अधिकारी जानोरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन विषयी माहिती दिली त्यामध्ये गट शेती करण्याचे फायदे, सेंद्रिय निविष्ठा तयार करणे त्यांचे फायदे,पिकांची फेरपालट, जीवामृत,दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत,घन जीवामृत तसेच इतर विविध घटकांविषयी माहिती दिली तसेच कृषि विभागाच्या विविध योजनाची माहिती दिली. प्रगतिशील शेतकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .या प्रशिक्षण वर्गाला सरपंच अमोल भिंगारे यांचे सह गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.