
राजाभाऊ मुंडेंचा लेकासह अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; पंकजा मुंडेंना धक्का…
बीडजिल्ह्याच्याराजकीयवर्तुळातूनएकामोठीबातमीसमोरआलीआहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मोठाराजकीय धक्का देण्यात आला आहे . गेल्या 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे . ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असून हा पक्ष प्रवेश निश्चित झल्याचे बोलले जात आहे . आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेऊन हा पक्षप्रवेश निश्चिती झाली आहे.
पक्षातून सतत डावलले जात असल्याने पक्षालारामरामकरण्याचानिर्णय
पुढेआलेल्यामाहितीनुसार, माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहे. मात्र पक्षातून डावलले जात असल्याने मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने पंकजा मुंडेंना धक्का मानला जातोय.
मुंडे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
– मुंडे कुटुंब 35 वर्षांपासून भाजपा विशेषतः दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या सोबत आहेत.
– राजाभाऊ मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक तसेच भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत.
– राजाभाऊ मुंडे यांनी राज्य शिखर बँकेचे संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे.
– तर बीड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष देखील ते राहिले आहे.
– मंगल राजाभाऊ मुंडे या 2014 ते 2019 च्या कालावधीत वडवणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत.
– तर बाबरी मुंडे जिल्हा बँकचे संचालक होते.
– धारूर बाजार समितीचे सभापतीपद सध्या मुंडे कुटुंबाकडे आहे. तर वडवणी नगर परिषदेचे गटनेते पद आहे.
– राजाभाऊ मुंडे यांची मुलगी अनिता मुंडे चिखलबीड गटाची जिल्हा परिषद सदस्य आहे.