
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय !
ऑगस्ट महिना म्हणजे सणा सुदीचा महिना! या महिन्यात शैक्षणिक कामांमध्ये अनेक सुट्ट्या दिसून येतात. दरम्यान, या सुट्टयांसंबंधित एक महत्वाचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाने मुंबई आणि कोकण विभागातील शाळांसाठी यंदाचा गणपती अधिक धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी २ दिवसांची सुट्टी वाढवली आहे.
एकंदरीत, यंदाच्या गणपतीची सुट्टी ७ दिवसांची असणार आहे. २७ ऑगस्ट या दिवशी गणरायाचे आगमन होणार आहे. या दिवसापासून २ सप्टेंबरपर्यंत मुंबई तसेच कोकण विभागातील विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
मुळात, या सुट्ट्या फक्त कोकण विभाग आणि मुंबईत असणाऱ्या शाळांना लागू आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षांपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यातील इतर शाळांमध्ये फक्त तीन दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. आधी गणपतीची सुट्टी ५ दिवसांसाठी देण्यात यायची पण आता तेच वाढवून ७ दिवसांवर करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात ‘या’ दिवशी असतील सुट्ट्या:
ऑगस्ट २०२५ मध्ये महाराष्ट्रातील शाळांना अनेक सण, उत्सव आणि रविवारच्या निमित्ताने सुट्ट्या मिळणार आहेत. ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन साजरा होणार असल्याने या दिवशी सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर १० ऑगस्ट हा रविवार असल्याने नियमित साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्ष एकत्र आल्यामुळे शाळांना पुन्हा सुट्टी राहणार आहे. १६ ऑगस्टला गोपाळकाला आणि दहीहंडी असल्याने राज्यातील शाळा बंद असतील. पुढे १७ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट हे दोन्ही दिवस रविवार असल्याने त्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून, मुंबई आणि कोकणातील विद्यार्थ्यांसाठी २ सप्टेंबरपर्यंत सलग सात दिवसांची गणेशोत्सवाची सुट्टी मिळणार आहे. अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यात विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतील.