
रोहिणी खडसेंना पती प्रांजल खेवलकरने सांगितली महत्वाची माहिती !
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत रंगेहात पकडण्यात आलं. ज्यानंतर अनेक आरोप ही सातत्याने केली जात आहेत. एकनाथ खडसे यांनी तर थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली.
आता नुकताच खडसेंनी महत्वाची माहिती सांगितली. एकनाथ खडसे म्हणाले की, पुणे पोलिसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केलं आहे.
पती प्रांजल खेवलकरांनी पत्नी रोहिणी खडसेंना दिली महत्वाची माहिती
पुणे पोलिस आयुक्त आमच्या प्रश्नाना उत्तर का देत नाहीत? या प्रकरणातील महिला आरोपींसह पोपटानी आणि श्रीपाद यादव यांना प्लांट करण्यात आलं आहे. यादव आणि पोपटानी हे गेल्या 15 दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत. या प्रकरणी मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार आहे. यासंदर्भात असिम सरोदे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे.
कोर्ट परिसरात प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसेंमध्ये संवाद
पुढे बोलताना खडसेंनी म्हटले की, पुणे पोलिसांनी कोर्टात काल राहुल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, हे सर्व प्रकरण प्लांट असल्यामुळे यापुढे आणखी काही नावं पोलीस आणू शकतील. देवा शपथ सांगतो मी असं काही केलं नाही, माझं त्या मुलींशी काही संबंध नाही, असं काल कोर्टात प्रांजल खेवलकरांनी पत्नी रोहिणी खडसेंना सांगितलं, असे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांवरच थेट गंभीर आरोप
पुणे पोलिसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केलं आहे, असेही त्यांनी परत म्हटले. काल पुणे कोर्टात प्रांजल खेवलकर आणि इतरांना हजर करण्यात आलं. यावेळी रोहिणी खडसे या पतीसाठी कोर्ट घालून कोर्टात दाखल झाल्याचे बघायला मिळाले. रोहिणी खडसे या वकील असून पतीला वाचवण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट देखील घेतली. ज्यावेळी खडसेंची प्रेस सुरू होती, त्यावेळी पुणे पोलिस तिथे दाखल झाले होते, त्यानंतर खडसेंशी संताप व्यक्त केला.