
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत आणि रशियाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधले होते. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आणि दंडाची घोषणा केली आहे.
त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे बोलत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधाबद्दल जागरूक राहायला हवे. तसेच स्वदेशी उत्पादनांवर भर देत पुढे गेले पाहिजे.