
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनीधी – प्रशांत देशमुख
दोन दिवसा पूर्वी चालू वार्ता ने कचऱ्या सबंधित बातमी केली होती तरीसुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यानी कोणतीच सुधारणा केली नाही. आजचे दृश्य फार
विचलित करणारी व भयावक होते. मोरे पेट्रोलपंप( पोकळे पाटील चौक- शिवणे)जवळील कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा कळपच जमा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या जवळून मोकाट जणांवरे फिरत आहेत. एखाद जनावर उधळले तर केवढा मोठा अपघात होऊ शकतो हे पलिकेच्या अधिकार्यांना दिसत नाही कां? कां अपघात झाल्यावरच शहाणपण येणार आहे कां? हे दृश्य गेल्या अनेक दिवसापासून आहे.महानगर पालिकेने मोकळी जागा पाहून गावापासून लांब कुठेतरी कचऱ्याची व्यवस्था करावी. अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.गायीचा कळप सकाळच्या वेळी लोकांची कामावर जायची गडबड असते त्यावेळी रस्त्यावर पसरलेला असतो.अपघात व्हायला काही क्षण पुरेसा असतो.
पशु प्रेमी संघटना कुठेआहे? या कचऱ्यातून गायी च्या पोटात प्लास्टिक जातं आहे जे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. या गोष्टींची दखल ही घ्यायला हवी. गायी ला गरजेपुरतेच देव मानायचे कां? याचा विचार ही जनतेने करावा. पुणेमहानगर पालिकेने यावर्ती विचार करायला हवा अन्यथा जनतेच्या तीव्र रोश्याला पालिकेला सामोरे जावे लागेल.