
पुण्यात भर चौकात मोठा राडा; २२ वर्षीय तरूणीवर…
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. सुदैवाने ता या हल्ल्यातून बचावली.
मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. थेरगाव येथील एम. एम. चौकात हा सर्व प्रकार घडला.
एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना थेरगाव येथील एम. एम. चौकात शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सलमान रमजान शेख (वय २९, रा. रोहन वाइन्समागे, विजयनगर, काळेवाडी) आणि हुजेफा आबेद शेख (२७, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, मूळ रा. वाहेगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिने याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामावर असताना आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आले. आरोपी सलमानने ‘तलाक का देत नाहीस,’ या कारणावरून फिर्यादीचे कामावरील सहकाऱ्यांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार केले. प्रतिकार करताना तिच्या डोक्यावर, गालावर आणि कानामागेही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दोन बांगलादेशींना अटक
पिंपरी : रिव्हर वहा हॉटेलमध्ये बांगलादेशातून भारतात बेकायदा प्रवेश करून राहणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चिंचवडगाव येथील थेरगाव विसर्जन घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली. सुनांदोकुमार नितायचंद दास (वय ३५, मूळ रा. हसमदिया, भांगा नगरपालिका, जि. फरिदपूर, बांगलादेश) व अमित विश्वजित मंडल (वय २५, मूळ रा. तेघरीहुडा, कालीगंज, जि. झेनाईदाह, बांगलादेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस हवालदार संतोष डोंगरू उभे यांनी शनिवारी (१६ ऑगस्ट) या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०१९ व २०२४पासून भारतात बेकायदा राहत होते. विशेष म्हणजे, आरोपी अमित विश्वजित मंडल याने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र तयार करून स्वतःला भारतीय दाखवले होते. ही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.