
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम – शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम होत्या. तर विद्या विकास मंडळ, पाथरूड संस्थेचे सहसचिव आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शिंदे प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली, जे डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत गायन करण्यात आले.
प्रा. एन. आर. जगदाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठ निर्मितीतील योगदान, त्यामागील ऐतिहासिक प्रक्रिया आणि उद्दिष्ट याबाबत थोडक्यात व प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, व NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये पुढील प्रा. व डॉ. यांचा समावेश होता:
प्रा./डॉ.: टी. आर. बोराडे, के. जी. गव्हाणे, जी. यू. तिजारे, ए. डी. दुंघव, जी. एच. सुरवसे, एन. डी. पडवळ (NSS प्रमुख), एस. बी. भांडवलकर, आर. एस. गायकवाड, जी. एस. खंदारे, ए. एम. कुटे, एस. एम. माळी, एन. एन. भोंग, एस. ए. आगे, जे. डी. मसराम, आर. डी. राठोड, जी. डी. कऱ्हाळे, ए. एल. डोंगरदिवे, सौरभ जगदाळे, बरकुल सर, आर. एल. तावरे मॅडम, एस. एम. अलगुंडे मॅडम, डी. जी. गिरी मॅडम, पी. पी. सुतार, रुपाली मोरे.
अधिकारी/कर्मचारी: श्री. सोमनाथ शेळके (अधीक्षक), श्री. कुंदन बोराडे, श्री. शहाजी आठवले, श्री. संतोष शिर्के, श्री. कैलाश शेंडगे.
विद्यापीठाच्या स्थापनेचा व गौरवशाली इतिहासाचा गौरव करताना सर्वांनी विद्येच्या विकासासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.