
इगतपुरी प्रतिनिधी :- श्री.विकास पुणेकर
इगतपुरी :- मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर रायगडनगर (वाडीवऱ्हे) जवळ बस अपघातात १५ ते २० जण जखमी झाले. दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०४:४५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव कडून पनवेलकडे जाणाऱ्या बसने अज्ञात वाहनाला धडक दिली. या जखमींना तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये रमा गावडे, फकीरा परदेशी, शोभाबाई खैरे, सुमनबाई कोष्टी, बारकू पाटील, मुंबरा कोष्टी, देवकाबाई कवडे, विमलबाई पाटील, शिवाजी चव्हाण, अरुणाबाई चव्हाण, संतोष देशमुख तसेच इतरही काही प्रवासी जखमी झाले. या जखमींना जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या रुग्णवाहिकेने तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.