दै चालू वार्ता तालुका प्रतिनिधी:- भागवत घुगे
रिसोड:- स्थानिक ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक शाळा रिसोड येथे स्काऊट आणि गाईडच्या माध्यमातून खरी कमाई या उपक्रमाच्या अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक
आदरणीय देशमुख सर यांनी केले व तसेच मुलांना खरी कमाई करत असताना स्वच्छता व पदार्थाची गुणवत्ता या बाबींवर लक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर वर्ग पहिली ते दहावी पर्यंत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा खुला करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आदरणीय खानझोडे सर, जोगदंड सर, पांडे सर,राठोड सर व तसेच तवर मॅडम, सरनाईक मॅडम, पडघान मॅडम,शिंदे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय भुतेकर सर यांनी केले.
